Dharashiv Blue Water: राज्यात सर्वदूर मान्सूनला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, काही ठिकाणी सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळं नदी-नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. तर, काही ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसानंतर एक अजबच चमत्कार घडला आहे. धाराशिव जिल्ह्यातून अचानक जमिनीतून निळं पाणी येऊ लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला शिवारामध्ये काल सायंकाळी रस्त्याच्या कडेला वीज पडली होती. ज्या ठिकाणी वीज पडली त्या जागेवरून जमिनीतून पाणी येऊ लागलं. विशेष म्हणजे हे पाणी निळ्या रंगाचे आहे. विज पडल्यानंतर त्या ठिकाणावरून अचानक जमिनीतून निळं पाणी येऊ लागलं, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकारानंतर भू वैज्ञानिकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


हे पाणी जमिनीतून येत आहे की परिसरातून पाझरले आहे. याचा शोध हे पथक घेत आहे. अचानक जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी एकच गर्दी केली. नेमकं हा काय प्रकार आहे व पाण्याचा रंग निळा कसा झाला, या सारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्या प्रकाराचा गावच्या सरपंचांनी खुलासा केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)


निळं पाणी आलं कुठून?


रामेश्वर वैद्य आमच्या गावात दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला होता. तेव्हा अफवा पसरली की वीज कडकडल्यामुळं निळं पाणी वाहतं आहे. आज आम्ही जावून प्रत्यक्षपणे जाऊन पाहणी केली. तेव्हा पाहिलं की, बाजूच्या खड्ड्यात रंगाचा बॉक्स दिसला. त्या खड्ड्यातून पाणी झिरपत होते.  निळ्या रंगाचे वाहिलेलं पाणी जमिनीमधून आलेलं नसून या पाण्यामध्ये रंग मिसळला. त्यामुळं अचानक निळ्या रंगाचे पाणी प्रवाहित झाले, अशी माहिती सरपंच रामेश्वर वैद्य यांनी दिली आहे.


धाराशिवमध्ये पावसाचा कहर


धाराशिव जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत आहे. मरगा तालुक्यात माडज, वाढदरी, गुगळगाव या भागात रात्रीपासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने या परिसरामध्ये पाणीच पाणी करून टाकलेय. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. दुष्काळाचा सामना करत असलेल्या धाराशिवकरांना यंदा मात्र पहिल्याच पावसाने सुखावल्याचे चित्र आहे.


शेतामध्येदेखील पाणी साठल्याचे चित्र आहे.दरम्यान पहिल्याच या पावसाने धाराशिव शहराची अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे. शहरातील रस्त्यांवर पाणी साठले आहे. तर धाराशिव बस स्थानकामध्ये देखील पाणी साठले आहे. बसस्थानकाला डबक्याचे स्वरूप आले आहे.