कृष्णात पाटील, मुंबई : मालमत्ता कर वसुलीसाठी मुंबई महापालिकेनं धडक मोहिम हाती घेतली आहे. पोलिकेच्या धडक कारवाईचा मोठा दणका मुंबईतल्या बड्या धेंडाना बसला आहे. मालमत्ता कर थकवला म्हणून मुंबईतल्या एका मोठ्या बिल्डरवर BMW कार जप्तीची नामुष्की ओढावली आहे. (BMC Seized car)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका प्रशासनानं मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. कुठं आलिशान वाहनांची जप्ती केली जातेय. तर कुठे पाणीपुरवठा तोडला जातोय. मुंबई एम पश्चिम भागात चंदुलाल लोहना या बांधकाम व्यावसायिकांनं मालमत्ता करापोटी 38 लाख 80 हजार रूपये थकवले होते. नोटीस देऊनही बांधकाम व्यावसायिक थकबाकी भरेना...अखेर पालिकेनं थेट लोहना यांची BMW कारच जप्त केली, जप्तीची नामुष्की ओढावल्यानंतर या विकासकानं पालिकेकडे तात्काळ 19 लाखांचा भरणा करत आपली BMW कार सोडवली.


चालू आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेनं 5 हजार 200 कोटी मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य ठेवलंय. त्यापैकी 3 हजार 650 कोटी रूपयांचीच वसुली आतापर्यंत झाली आहे.


मुंबई महापालिकेचे असे अनेक थकबाकीदार आहेत ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे. पण करांचा भरणा करण्याची दानत नाही. पण तुम्ही सजग नागरिक या नात्यानं पालिकेच्या करांचा नियमितपणे भरणा करा...नाहीतर या बिल्डरसारखं तेलंही गेलं आणि तूपही गेलं असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येईल...शिवाय करबुडव्या म्हणून लागलेला ठपका वेगळाच...