रायगड :  रायगडमधल्या आपटा इथल्या वस्तीच्या एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्याचा गंभीर प्रकार बुधवारी रात्री समोर आला. ही घटना वाऱ्यासारखी पसरली नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. रात्री एकच्या सुमारास हा प्रकार समोर आला.पण पोलीस आणि बॉम्ब शोध पथकाने वेळीच दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पहाटे 4 च्या सुमारास सापडलेला बाँम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आले आहे. पेणहून आपटा इथं वस्तीसाठी गेलेल्या एसटी बसमध्ये बाँम्ब होता. चार तासांनंतर बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश आले. मात्र बॉम्ब सापडल्यामुळे आपटा परिसरातले नागरिक भयभीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड पोलीस आणि बॉम्ब शोध पथक वेळीच घटनास्थळी पोहोचले. आणि बॉम्ब सदृश्य वस्तू जप्त करण्यात आल्या. घाबरण्याचे काही कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पहाटे चार वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर स्वत: हजर होते. 


ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसमध्ये अशाप्रकारे बॉम्ब सापडणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी असे नागरिकांचे म्हणणे आहे. पण यामध्ये नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही असे पोलीसांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका आणि अफवांना बळी पडू नका असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.