मुंबई : पुण्यातल्या लवासाच्या रहिवशांना आता रेरा अंतर्गत तक्रार करता येणार आहे. निकृष्ट बांधकाम, अर्धवट बांधकाम, बांधकामासाठी जर जास्त रक्कम व्यायवसाय़िकानं घेतली असेल किंवा ओसीसारख्या सर्व तक्रारी घरमालकांना करता येतील. त्यामुळं त्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी मुंबईतल्या सुमारे ५० हजार सदनिकाधारकांना या निर्णयामुळं दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'महारेरा'चे मुख्यालय मुंबईत आहे. रेराचा कारभार ऑनलाईन माध्यमातून चालतो. त्यामुळे तक्रारदांराना ऑनलाईन तक्रार करता येते. पुणे, नागपूर येथे ही  विभागीय कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत. 'क्रेडाई' या बांधकाम व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींचा आणि मुंबई ग्राहक पंचायत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे.