लोणावळा : मुंबईतील बोरीवलीकडून पुण्याकडे जाणाऱ्या व्होल्वो बसला भीषण आग लागली. एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीता व्होल्वो या कंपनीची ही बस आगीमध्ये संपूर्ण जाळून खाक झाली. शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही आग लागली. या आगीमुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती.


दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. या बसमध्ये तीस प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


याआधीही एका ट्रकला आग लागली होती. ही आग खंडाळा घाटात लागली होती. पाहा हा व्हिडिओ -