पुणे : मोबाईल आणि डिजिटल गेम्सच्या वाढत्या व्यसनामुळे आज एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. आई-वडिलांनी गेम खेळायला मोबाईल हाती दिला नाही म्हणून एका चिमुरड्यानं गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलंय. दर्शन मनिष भुतडा असं या १३ वर्षीय मुलाचं नाव आहे. पुण्याच्या धनकवडी भागातल्या गणेश नगर परिसरात ही घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्शननं सोमवारी संध्याकाळी राहत्या घरी कमरेच्या पट्ट्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. धनकवडीतील गणेश नगर भागातील सिद्धी सोसायटीत भुतडा कुटुंब राहतं. दर्शनची आई बँक कर्मचारी आहे तर वडील एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. 


गेल्या काही दिवसांपासून दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. त्याचं इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष नसल्यानं पालकांनी दर्शनला मोबाईल देणं बंद केलं होतं. पण, ही गोष्ट काही दर्शनला रुचली नाही... आणि त्यानं चक्क आत्महत्येचा मार्ग निवडला.


मोबाईलच्या आणि गेमच्या हट्टापायी अवघ्या १३ वर्षांच्या दर्शननं केलेली आत्महत्या परिसराला सुन्न करून गेलीय.