सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुलं पळवणारी टोळी (Kidnapping gang) सक्रिय असल्याच्या जोरदार अफवा (rumor) पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर (social media) यासंदर्भात जोरदार मेसेज, व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये (parents) घबराट उडाली आहे. यामुळेच काही लोकांना बेदम मारहाण (beating) देखील करण्यात आली आहे. ठाणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या शहरांमध्ये मुले पळविणारी टोळीचे (Kidnapping gang) सदस्य असल्याचे समजून संशयित लोकांना मारहाण करण्यात येत आहे.  (boyfrined wearing burkha Understandably beaten  gang of child stealers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता एका प्रियकरालाही मुले पळवणाऱ्या टोळीचा सदस्य समजून मारहाण करण्यात आलीय. नाशिकच्या वडाळा गाव परिसरात शनिवारी ही घडली. बुरखा घालून हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. मात्र मुलं चोरणाऱ्या टोळीचा सदस्य समजून लोकांनी या प्रियकराला बेदम मारहाण केलीय.


मारहाणीनंतर लोकांनी या तरुणाला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर या प्रियकराला समज देण्यात आली व काही तासानंतर सोडून देण्यात आले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नेमकं काय घडलं?


वडाळा गाव येथे गणेश नगरात राहणारा एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून गेला. पण पायातील बुटावरून त्याचे पितळ उघडं पडलं. पायात बूट व डोक्यावर बुरखा यामुळे लोकांना त्याचा संशय आला. लोकांनी त्याला पकडलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.


 



मारहाणीनंतर बुरख्याच्या आड लपलेल्या प्रियकराने आपण प्रेयसीला भेटण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्याच वेळेस वाहन गर्दी पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच हस्तक्षेप करत तरुणाला ताब्यात घेतले. इंदिरानगर पोलिसांनी विचारपूस करत समज देत त्याला सोडून दिले. 


दरम्यान, नाशकात मुलं पळणारी टोळी आल्याची अफवा काही दिवसांपासून सोशल मीडिया वर व्हायरल झाली आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी संशयित लोकांना मारहाण करण्यात येत आहे.