जयेश जगड, झी मीडिया, अकोला : भारतात महिलांच्या स्तन कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रानिक्स आणि सुचना प्रोद्यागीक विभागाकडून या कर्करोगाच्या निदानासाठी विकसीत थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानावर आधारीत थर्मल प्रतिमा असलेले ब्रेस्ट जॅकेट साकारण्यात आले. ब्रेस्ट जॅकेटचे लोकार्पण देशात प्रथमच ना. संजय धोत्रे यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रूग्णालयात करण्यात आले. यावेळी  इलेक्ट्रानिक्स आणि सुचना प्रौद्योगीकी विभागाचे सचिव अजय प्रकाश सावनीसह जिल्ह्यातील आमदार आणि मान्यवर उपस्तित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेस्ट जॅकेट हे स्तन कर्करोगाचे निदान करण्यासाठी सुलभ आणि सोपे उपकरण आहे. या उपकरणासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही. हे एक थर्मल जॅकेट असल्यामुळे स्त्रीयांना वापरण्यासाठी सोईचे आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रानिक्स आणि  सुचना  प्रौद्योगीक विभागातंर्गत कार्यरत असलेल्या 'सी-मेट' या संस्थेव्दारे थर्मल ब्रेस्ट जॅकेटचे संशोधन करण्यात आले 


सदर जॅकेट मेड-इन इंडिया कार्यक्रमातंर्गत मुराटा या जपानी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या करारानुसार याचे उत्पादन भारतात करण्यात येणार आहे. त्यानंतर स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा हा जॅकेट त्यानंतर देश विदेशात पाठविण्यात येणार आहे.