अकोला : अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ मोबाईलच्या हेडफोनसाठी एका भावाने आपल्या लहाण बहिणीची हत्या केली असून या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा नंदनलाल यादव असं मृत 19 वर्षीयय तरुणीचं नाव आहे तर 24 वर्षीय ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव असं मारेकरी भावाचं नाव आहे. बॉबी हा  नेहाचा आतेभाऊ आहे. 


नेमकी घटना काय?


आज संध्याकाच्या सुमारास बॉबी आणि नेहा या दोघांमध्ये मोबाईलच्या हेडफोनवरुन वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापलेल्या बॉबीने आपल्या लहान बहिणीच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी केलं. जखमी झालेल्या नेहाची आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि जखमी नेहाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. पण त्याआधीच नेहाचा मृत्यू झाला. 


आरोपी बॉबीला खदान पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या नराधम भावाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करु लागले आहेत.