पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड ची बी आर टी खरं तर शहरवासीयांचा अभिमान...पण हीच बी आर टी आता शहराचा लौकिक घालवते की काय अशी स्तिथी आहे...त्याला कारण आहे प्रस्तावित मार्गावर उभारण्यात आलेल्या बी आर टी बस थांब्यावर सुरू असलेले उद्योग...! काय आहे हा प्रकार पाहुया हा रिपोर्ट...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पिंपरी चिंचवड च्या बी आर टी मार्गावर उभारण्यात आलेले बस थांब्यांचा वापर दारूड्यांनी दारू पिण्याचे अड्डे म्हणून केले आहेत. एवढंच नाही तर काही ठिकाणी तर नागरिक बिनधास्त गाड्या पार्किंग करून जात आहेत...काही जणांनी तर बीआरटी बस थांबे जणू आपलेच आहे अश्या थाटात पार्किंगसाठी पैसे घेऊन वाहने लावून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केलाय...



पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात 45 किलोमीटर बीआरटी मार्ग चालवण्याचे उदिष्ट आहे..त्यापैकी सांगवी किवळे हा 14.5 किमी चा आणि नाशिक फाटा- वाकड हा 8 किमी चा मार्ग सूरु आहे.. तर निगडी - दापोडी आणि काळेवाडी फाटा ते देहू आळंदी या मार्गाचे काम सुरू आहे..त्यापैकी निगडी दापोडी रस्त्यावर 36 बस थांबे तर काळेवाडी देहू आळंदी मार्गावर 9 बस थांबे बांधून तयार आहेत.. त्यावर बस थांब्यावरच हे उद्योग सुरू आहेत...! ते त्वरित थांबवण्याची मागणी आता केली जातेय...


 दुसरीकडे महापालिकेने मात्र पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम वाहतूक विभागाचे आहे असं सांगत हात झटकण्याचे काम सुरू केलंय..असे प्रकार घडत असतील तर तुम्ही चित्रीकरण द्या आम्ही कारवाई करू असा अजब तर्क ही लागलाय..!


 वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड ची बी आर टी खरंच यशस्वी आहे पण त्याच बरोबर त्याची ही दुसरी काळी बाजू ही आहे...लाखो रुपये खर्चून उभारलेले हे बस थांबे जर जुगाराचे आणि दारुड्यांचे अड्डे बनले तर नुकसान सर्वांचेच आहे..!