रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत सांगलीत 'हळदीच्या खरेदी-विक्रीचा केंद्रा'चा शुभारंभ झाला आहे. हळदीला जागतिक मार्केट उपलब्ध होणार आहे. बीएसईकडून व्यापाऱ्यांसाठी एक वर्षाची फी सवलत, तर शेतकऱ्यांसाठी पहिल्या हंगामात स्टोरेजच्या फीची सवलत जाहीर करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील हळदी उत्पादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगलीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत 'हळदी'च्या खरेदी-विक्री व्यवस्थेचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने हळदीला जागतिक मार्केट उपलब्ध झालं आहे. बीएसईकडून व्यापाऱ्यांसाठी एक वर्षाची फी माफी, तर शेतकऱ्यांसाठी पहिल्या हंगामात स्टोरेजसाठी फी माफ असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. या कार्यक्रमास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हळद गुणकारी शेतीमाल असून रोजच्या वापरात हळद ही हमखास वापरली जाते. स्वयंपाक, देवपूजा, सुहासीनीचे सौभाग्य लेणे, सौंदर्य प्रसाधन, अन्न पचनासाठी औषध  निर्मिती करताना हळदीचा वापर केला जातो.


सेलम, निजामाबाद, देशी कडापा, राजापुरी, कृष्णा, टेकुरपेटा आणि आलेपी इत्यादी हळदीचे प्रमुख प्रकार आहेत. जगातील एकूण हळदी पैकी ८० टक्के उत्पादन भारतात होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या चार राज्यात हळदीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते.


हळदीसाठी सांगली प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन, साठवणूक प्रक्रिया, वायदे बाजार आणि बाजारपेठ हे सर्व टप्पे सांगली जिल्ह्यातच आहेत. सांगली जिल्ह्यातील हरिपूर गावात शंभर वर्षा पासून जमिनीतील पेवात हळद पिकवली जाते. देशात बहुदा जमिनीत हळद पिकवणारे हरिपूर एकमेव ठिकाण आहे.


सांगली हे हळद व्यापाराचे प्रमुख केंद्र असून हळद बायदे बाजाराचे देशातील हे एकमेव ठिकाण होतं. हळदीचा भाव हा सांगलीतून ठरवला जातो. पण मागील काही दिवसात हळदीला क्विंटलला २५ हजारापर्यंत विक्रमी दर मिळाला होता. सांगलीत हळदीच्या खरेदी-विक्रीमध्ये पंधराशे ते दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते.


बीएसईने आज हळदीमध्ये 10 मेट्रिकट टनच्या आकाराच्या कमोडिटी डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंग सुरू केले. हळद करारासाठी मूळ वितरण केंद्र हे निझामबाद असून, अतिरिक्त केंद्र सांगली, इरोडे आणि बासमत येते सुरू करण्यात आली आहेत.


सांगलीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना, ऑनलाइन खरेदी-प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. जागतिक मार्केट उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव या पेटीमध्ये मिळणार आहे. शेतकरी, अडते, व्यापारी यांच्या बरोबरच, गोडावूनमध्ये काम करणारे कर्मचारी, माथाडी कामगार यांना ही याचा मोठा फायदा होणार आहे.