Buldhana Accident : बुलढाण्यात (Buldhana) नागपूर - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर (Nagpur-Mumbai National Highway) भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रक झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर महामार्गाच्या कामासाठी आले होते अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे ही घटना घडला आहे.  नागपूर - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने झोपलेल्या मजुरांना चिरडलं आहे. या अपघातात चार मजूर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींवर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सगळे मजूर महामार्गाच्या कामासाठी आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान भरधाव ट्रक झोपडीत घुसल्याने हा अपघात घडला.


नेमकं काय घडलं?


नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे चिखलदरा येथील काही मजूर रस्त्याच्या कामासाठी इथे आले होते. दरम्यान महामार्गाच्या बाजूला झोपडीत झोपले असताना सकाळी 5.30 च्या सुमारास PB-11/CZ 4047 या आयशर ट्रकने वडणेर भुलजी गावाजवळ झोपलेल्या मजुरांच्या झोपडीला जोरदार धडक दिली. या अपघातात झोपडीत झोपलेले प्रकाश बाबु जांभेकर, पंकज तुळशीराम जांभेकर, अभिषेक रमेश जांभेकर याचां मृत्यू झाला. तर दिपक खोजी बेलसरे, राजा दादु जांभेकर यांच्यावर मलकापूर येथे शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी बुलढाणा येथे संम्पर्क साधून माहिती घेतली. तसेच अपघातग्रस्तांना मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.


बुलढाण्यात बाईक अपघातात दोन तरुणांचा मृत्यू


दरम्यान, बुलढाण्याच्या खामगावमध्ये शनिवारी रात्री बाईक दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी परिसरात घडली. घाटपुरी येथील पोस्टमन कॉलनीतील शंकर तांदळे आणि गोपाल गंगतीरे हे दोघे दुचाकीने एमआयडीसी परिसरातून जात होते. त्याचवेळी अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोल्याच्या सर्वोपचार रूग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरु असतानाच दोघांचाही मृत्यू झाला.