Buldhana Samrudhi Expressway Bus Accident : नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या विदर्भ बसला भीषण अपघात (Accident News) झाला. या भयानक अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 8 प्रवासी सुखरुप असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. झी 24 तासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासाशी बोलताना अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. (Buldhana Samrudhi Expressway Bus Accident Eknath Shinde 5 lakh aid announced to the relatives of the deceased) दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळाला भेट देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रात्री नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघाता झाला. प्राथमिक माहितीनुसार खांबाला बस धडकल्यामुळे ती संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. त्यानंतर ती पलटी झाली आणि तिचा काही सेकंदात आग लागली. या बसमध्ये 30 प्रवाशी असल्याचं बोलं जातं आहे. त्यातील 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने प्रवासी झोपले होते. जे प्रवासी कंडक्टरच्या जागी बसले होते ते थोडक्यात बचावले आहेत. ( Nagpur Pune Bus Accident Fire at Buldhana)


8 जण सुखरुप असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रशासनासमोर आता मोठं संकट उभं राहिलं आहे, ते म्हणजे या अपघातील होरपळलेल्या बॉडीची ओळख कशी पटवणार ती. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरी आतापर्यंतचा हा सर्वात भीषण अपघात आहे. ज्या वेळी बसला अपघात झाला त्यावेळी बस चालकसह 8 जण बसच्या काच्या फोडून बाहेर पडले. 



बचावलेल्या प्रवाशाने सांगितलं की, रात्री जेवण करुन बसमध्ये बसल्यानंतर साधारण अर्धा तासानंतरच बसला अपघात झाला. बस पलटी झाल्यावर त्यांनी बसची खिडकी तोडली आणि बाहेर उड्या मारल्या.



दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटवरुन शोक व्यक्त केला आहे. 



केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 



बस टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यानंतर डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि बसमध्ये भयंकर आग लागली. साधारण रात्री दोनच्या सुमारही ही भीषण दुर्घटना घडली.