बुलढाणा : एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत आहेत. त्यांच्यावर चोहोबाजूनं टीकाही होतेय. आता शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी वारीस पठाणांवर टीका केली आहे. मात्र यावेळी त्यांची जीभ घसरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा जीभ घसरल्यास आमची तलवार चालल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीही गायकवाड यांनी जाहीर कार्यक्रमात दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जांभूळधाबा इथल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आता गायकवाड यांच्या बोलण्यानं आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.


माफीनामा 


आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी पडू असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमच्या वारिस पठाण यांनी केले. यानंतर त्यांच्यावर चहोबाजुनी टीकेची झोड उठली. माझे वक्तव्य कोणत्या धर्माविरोधी नव्हते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी माझे शब्द मागे घेतो असे म्हणत त्यांनी आपला माफीनामा जाहीर केला. त्यामुळे वादग्रस्त विधानावर वारिस पठाणांची सारवासारव पाहायला मिळाली.



कोणत्या धर्माचा अपमान केला नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे वारिस पठाण म्हणाले.


वादग्रस्त विधान


आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय होईल, असं वक्तव्य केलं आहे. वारीस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं, त्यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवीसी देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.


वीटेचं उत्तर दगडाने उत्तर देऊ, आता तर वाघीणी बाहेर आल्या आहेत, आम्ही सर्व एकत्र आलो तर काय होईल, आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. कर्नाटकातील गुलबर्गामध्ये माजी आमदार वारीस पठाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.