COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर, पुणे : सध्या सह्याद्रीच्या द-याखो-यात एक वेगळाच नाद घुमतोय.... पाहूया सध्या भोरमध्ये काय धूम सुरू आहे....  ?


बुलेच्या धडधड फायरिंगचा आवाज, दुमदुमतोय महाराष्ट्राच्या डोंगर कपारीत..


पुण्याजवळच्या भोरमध्ये भरलेलं हे बुलेट संमेलन... BOBMC या क्लबच्या वतीनं हे संमेलन आयोजित करण्यात आलंय. देशभरातून तब्बल दोन हजार बुलेट रायडर्स भोरमध्ये दाखल झालेत.


डोंगर परिसरात या बुलेटसचा मेळा 


भोर तालुक्यातल्या करंदी गावच्या डोंगर परिसरात या बुलेटसचा मेळा भरलाय. बुलेट रायडर्सना वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती समजावी, यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये य़ा बुलेट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. यावर्षी या  फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राची सफर बुलेटस्वार करणार आहेत... भोरमध्ये डोंगराळ भागात बुलेट चालवणं म्हणजे बुलेटप्रेमींसाठी पर्वणीच. 


बुलेट संमेलनात बुलेट रेसचंही आयोजन


बुलेट संमेलनात बुलेट रेसचंही आयोजन करण्यात आलं होतं. भारत पेट्रोलियम स्पीडचे ब्रँड अँबेसेडर  नरेंद्र कार्तिक यांनी या रेसला हिरवा झेंडा दाखवला.
या बुलेट फेस्टिवलमध्ये ब-याच महिला रायडर्सनीही सगहभाग घेतला होता. महाराष्ट्राचा ग्रामीण भाग जाणून घेण्यासाठी त्या उत्सुक होत्या.


देशविदेशातल्या लय भारी बुलेटस


या बुलेट फेस्टिवलमध्ये देशविदेशातल्या लय भारी बुलेटस पाहायला मिळाल्या. या निमित्तानं धूम मचाले धूमचा हा थरार अनुभवणं भोरकरांसाठी एक भन्नाट अनुभव होता.