ठाणे : १५ मे २०२२ पर्यंत बुलेट ट्रेनचा समुद्रा खालून जाणारा बोगदा पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. त्यासाठी आता इंजिनियर्सनी कामाला सुरूवातही केलीय. 


जपानी तंत्रज्ञांनी केली पाहणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे खाडीतून या समुद्राखालच्या बोगद्याची सुरूवात होणार आहे. या बोगद्यासाठीचं सर्वेक्षण आज जपानी तंत्रज्ञांच्या सोबत करण्यात आलं. समुद्रतळाच्या खाली २५ ते ४० मीटर अंतरावरून हा बोगदा खोदण्यात येणार आहे. पुढल्या वर्षी प्रत्यक्ष बोगद्याच्या खोदकामाला सुरूवात होणार आहे. 


बोगद्याचा खर्च अंदाजे ३,५०० कोटी 


११ डिसेंबरपासून माहिती संकलनाला सुरूवात झालीय. २४ डिसेंबरपर्यंत हे माहितीचं संकलन पूर्ण करावयाचं आहे. जपानच्या कावासाकी जिऑलॉजीकल इंजिनिअरींग कंपनीचे तंत्रज्ञ जानेवारी २०१८ पर्यंत अहवाल सादर करणार आहेत. या बोगद्याचा खर्च अंदाजे ३,५०० कोटी रूपये येणार आहे.