मुंबई-गोवा महामार्गावर एसटीची गाडीला धडक, एकाचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसने रस्त्यावर थांबलेल्या इनोव्हा गाडीला धडक दिली.
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसने रस्त्यावर थांबलेल्या इनोव्हा गाडीला धडक दिली. या अपघातात इनोव्हा गाडीतील संजय वळंजू यांचा मृत्यू झालाय. चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे.
मुंबईत रहाणारं वळूंज कुटुंब गणपतीसाठी कोकणात गेलं होतं. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची इनोव्हा गाडी असुर्डेजवळ रस्त्याच्या कडेला उभी होती. पाठून येणा-या लांजा-मुंबई एसटीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं चालकानं इनोव्हा गाडीला जोरात धडक दिली. या अपघातात संजय वळूंज यांचा मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बसचालक फरार झालाय.