Bus Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर बोरघाटात बस दरीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी
Bus Accident : आताची सर्वात मोठी बातमी जुन्या पुणे-मुंबई हायवेवर बोरघाटात बस कोसळल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)
Bus Accident : आताची सर्वात मोठी बातमी...जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 30 जण जखमी आहेत. (Maharashtra News)
बोरघाटातल्या शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. ही खासगी बस पुण्याहून मुंबईला येत होती. तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली.
बचावपथक घटनास्थळी दाखल झालं असून दुर्घटनेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
बाजी प्रभू झांज पथक बसमध्ये
मुंबईच्या गोरेगावमधलं बाजी प्रभू झांज पथक या बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.. पुण्याचा कार्यक्रम आटोपून हे पथक मुंबईकडे निघालं होतं... तेव्हा हा अपघात झाला.
अपघातातील जखमींची नावे
1) नम्रता रघुनाथ गावणूक, वय 29
2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 गोरेगाव.
3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 गोरेगाव.
4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 गोरेगाव. 5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 गोरेगाव.
6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय 16 गोरेगाव.
7) आशिष विजय गुरव, वय 19, दहिसर.
8) सनी ओमप्रकाश राघव, वय 21, खालची खोपोली.
9) यश अनंत सकपाळ, वय 19, गोरेगाव.
10) वृषभ रवींद्र थोरवे, वय 14-गोरेगाव.
11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.
12) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 कांदिवली.
13) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 कांदिवली.
14) रुचिका सुनील धूमणे, वय 17, गोरेगाव.
15) ओम मनीष कदम, वय 18, गोरेगाव.
16) युसूफ उनेर खान, वय 14, गोरेगाव.
17) अभिजित दत्तात्रय जोशी, वय 20, रत्नागिरी.
18) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15, मुंबई.
19) हर्ष वीरेंद्र दुरी, वय 20, कांदिवली.
20) ओमकार जितेंद्र पवार, वय 24, खोपोली, सोमजाई वाडी
21) दिपक विश्वकर्मा, वय 21, कांदिवली.
22) हर्षदा परदेशी
23) वीर मांडवकर
24) मोहक दिलीप सालप, वय 18. मुंबई
शिवशाही बसचा भीषण अपघात
दरम्यान शुक्रवारी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाबा पेट्रोल पंपावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 14 जण जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बस नाशिकमधील होती. जेव्हा ही बस छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून निघाल्यानंतर बाबा पेट्रोल पंपाजवळ बस चालकाचा नियंत्रण सुटला आणि बस एका कंटेनरला जाऊन धडकली.