रायगड : मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस पुलावरून कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. माणगावजवळ पहाटे साडेपाचच्या सुमाराला ही घटना घडली. अपघातात २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून दापोलीकडे निघालेल्या बसला हा अपघात झाला. बस परळहून दापोलीकडे निघाली होती. बस माणगावजवळ कळमजे इथे आली असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून रूग्णालयात हलवलं आहे. जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व प्रवासी सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.