पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर जवळच्या लोहारमाळ गावाजवळ एका खाजगी आराम बसने अचानक पेट घेतल्याने ही बस आगीत पूर्णपणे जळून राख झाली. चालकाने प्रंसगावधान दाखविल्याने बसमधून प्रवास करणारे 48 प्रवासी सुदैवाने बचावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साई पूजा या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस कोकणातील कणकवली येथून 48 प्रवासी घेऊन मुंबई कडे जात असताना पोलादपूर शहरापासून पुढे काही अंतरावर आली असतानाच गाडीच्या मागील बाजूने धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्याने बस थाबवून प्रवाशांना तातडीने खाली उतरवलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.



मध्यरात्री 2 दोन वाजताची वेळ असल्याने तातडीने मदत पोहचेपर्यंत बस जळून खाक झाली. पोलादपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अग्नीशमन दलाला पाचारण करून एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे चाकरमान्यांने भीतिचं वातावरण आले. प्रवासात बसला अशी अचानक आग लागणं हे धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील प्रवास करताना थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे.