सांगली : राज्यात दोन लोकसभा आणि एका विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये सांगलीतल पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी जाहीर करण्यात आले आहे. विश्वजित कदम यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. कदम यांच्याविरोधात भाजपने आपला उमेदवार दिला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील १० विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये पलुस-कडेगाव (महाराष्ट्र) मधून काँग्रेसचे उमेवादर विश्वजित कदम यांना विजयी घोषीत करण्यात आलेय., नूरपुर (उत्तर प्रदेश) येथून भाजपच्या उमेदवाराला धक्का बसण्याची शक्यता आहे. या ठिकाणी भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. जोकीहाट (बिहार), गोमिया-सिल्ली (झारखंड), चेंगानूर (केरळ), अंपाती (मेघालय), शाहकोट (पंजाब), थराली (उत्तराखंड) आणि मेहेशतला (पश्चिम बंगाल) या दहा ठिकाणचे निकाल हाती येत आहेत.



दरम्यान,  काँग्रेस आमदार पंतगराव कदम यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या सांगलीतील पलुस-कडेगाव या जागेवर त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. कदम यांच्याविरोधात इतर राजकीय पक्षांनी उमेदवार न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा विजय झाला आहे.