सोनू भिडे, नाशिक:- आयुष्यात एकदा तरी युरोप टूर करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. याकरिता तीन ते चार महिने अगोदर संबधित टूर कंपनीकडे त्याची बुकिंग करावी लागते. नाशिकमधील डॉ. चंद्रभान मोटवाणी यांनी युरोप टूरची (Europe Tour) बुकिंग केली मात्र तब्येत खराब असल्याने त्यांना युरोप टूर करण शक्य नव्हते. संबधीत टूर कंपनीला या बाबत कळविले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. मोटवाणी यांनी नाशिक जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयाने टूर कंपनी विरोधात निकाल देत प्रवाशाला संपूर्ण रक्कम परत करण्याचा निर्णय दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोप टूरचे केले होते बुकिंग 


नाशिक (Nashik) मधील डॉ. चंद्रभान मोटवाणी यांनी २०२० साली “विणा वर्ल्ड” ( Veena World)  या प्रख्यात टूर कंपनीकडे युरोप टूरचे बुकिंग केले होते. या टूर करिता त्यांनी ४ लाख ६६ हजार ७८३ रुपये “विणा वर्ल्ड” यांना दिले होते. युरोप टूर २ मे २०२० रोजी जाणार होती. मात्र कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने संपूर्ण जगात लॉकडाऊन करण्यात आले होते. या कारणासाठी युरोप टूर रद्द करण्यात आली होती. याच दरम्यान मोटवाणी यांची तब्येत बिघडली होती. याची कल्पना टूर कंपनीला देण्यात आली होती. 


या कारणासाठी करण्यात आली तक्रार


युरोप टूरला जाण शक्य नसल्याचे टूर कंपनीला सांगण्यात आले. बुकिंग करिता देण्यात आलेल्या रकमेतून १ लाख ४० हजार रुपये परत देण्याचे आश्वासन विणा वर्ल्ड कंपनीकडून प्रवाशाला देण्यात आले होते. मात्र बरेच दिवस उलटूनही पैसे मिळत नसल्याने अखेर मोटवाणी यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात (Dist. Consumer Court)  विणा वर्ल्ड टूर कंपनी विरोधात तक्रार दाखल केली होती. 


न्यायालयाने दिला निकाल 


मोटवाणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर दोनही पक्षकारांची बाजू ऐकून घेण्यात आली. यात टूर कंपनीला नुकसानीचे कोणतेही कागदपत्रे सादर करता न आल्याने जिल्हा ग्राहक न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालात प्रवाशाने युरोप टूर करिता दिलेली रक्कम परत (Refund) करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हि रक्कम प्रवाशाच्या हातात मिळेपर्यंत १० टक्के व्याज सुद्धा देण्याचे आदेश टूर कंपनीला देण्यात आले आहे.