काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, बाईकस्वार थेट कारच्या टपावर
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात.
प्रथमेश तावडे / वसई : काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग. दैव बलवत्तर म्हणून... याचा प्रत्यय वसईत आला. भरधाव बाईकची कारला धडक लागली. या अपघातात बाईकस्वार थेट कारच्या टपावर गेला. त्यामुळे तो वाचला. वसई माणिकपूर येथील अपघाताचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.
वसई पश्चिम माणिकपूर येथील पेट्रोलपंपाजवळ कार आणि भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. या अपघातात चालक कारला आदळून थेट कारच्या टपावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री दहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वाराचा जीव बचावला आहे.
पेट्रोल पंपावर जाण्यासाठी कार वळत होती. इतक्यात भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने कारला जोरदार धडक दिली. दुचाकीचा वेग इतका होता की, स्वार असलेला चालक कारला धडकून थेट कारच्या टपावर फेकला गेला. त्याला कोणतीही इजा न होता तो पुन्हा उभा राहिला. दैव बलवत्तर म्हणून या चालकाचा जीव वाचला. त्याच्या बाईकचे मोठे नुकसान झाले.