राज्यात पोलीस असुरक्षित, व्हॅनने चिरडण्याचा प्रयत्न । सीसीटीव्हीत थरार
पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रकार, नागपूरच्या रस्त्यावरचा थरार.
नागपूर : राज्यात पोलीस (Police) असुरक्षित असल्याचं समोर आले आहे. कारण वारंवार अशा घटना समोर येत आहे. काल कोल्हापूर येथे पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली. तर ठाण्यात कोर्टातून सुनावणी पूर्ण करुन जेलमध्ये चाललेला कैदी पोलिसांच्या अंगावर थुंकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नागपुरात नेमकं काय काय घडल आहे. त्याचे सीसीटीव्ही चित्रण हाती आले आहे. नागपूरच्या रस्त्यावरचा थरार.
कारवाई केल्याच्या रागातून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला व्हॅननं चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागपूरच्या भांडे प्लॉट चौकातली ही घटना. यामध्ये हेडकॉन्स्टेबल सुभाष लांडे थोडक्यात बचावलेत. पण ते जखमी झालेत. तिथे सीसीटीव्ही होते, म्हणून ही घटना समजली.
पोलिसांनी व्हॅन चालक अरविंद मेटेला अटक केलीय. २४ फेब्रुवारीला लांडे यांनी व्हॅन चालक अरविंद मेटेविरोधात वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्याचाच राग मनात धरून गुरुवारी मेटेने हेडकॉन्टेबल लांडे यांना भांडे प्लॉट चौकात चिरडण्याचा प्रयत्न केला. तर कोल्हापूरात शुक्रवारी अतिक्रमणावरुन राजाराम चौकात पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता.