बुलडाणा : Car and petrol : पेट्रोल पंपावर एक धक्कादायक प्रकार उघड झाला. कारमध्ये पेट्रोल भरुन पेट्रोलचे पैसे न (No payment for petrol) देताच गाडी घेवून पळून गेल्याची घटना काल संध्याकाळी सात वाजण्याच्यादरम्यान खामगाव नांदुरा रोडवर येथील पेट्रोपंपावर घडली. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Car was filled with petrol,  Driver of the car fled without paying)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारची टाकी पेट्रोलने फुल केल्यानंतर घनश्याम ऑटो सर्व्हिस आमसरी पेट्रोपंपावरुन कार चालकाने धूम ठोकली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. सीसीटीव्हीत कारचा नंबर दिसत आहे. त्यावरुन तपासणी केली असता हा नंबर हे एका ट्रॅक्टरचा असल्याचे समजले. यामुळे कार सुद्धा चोरीची असल्याचे समोर येत आहे.


या घडलेल्या प्रकाराबाबत संदीप प्रल्हाद ठाकरे (सुजातपुर) याने शेंगाव तालुक्यातील जलंब पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पेट्रोल पंपावर एका कार आली. त्यामधील चालक आणि काही अनोळखी व्यक्ती होते. चालकाने टाकी फुल करण्याची सांगितल्यावरुन गाडीमध्ये 38 लिटर पेट्रोल भरले. (चार हजार दोनशे एक रुपये) कार चालकाने पैसे न देताच गाडी घेवून पळून गेला. असे दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.



या दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी कार चालकाविरुध्द कलम 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सीसीटीव्हीत दिसलेला कार नंबरचा हा बनावट असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. हा नंबर हे एका ट्रॅक्टरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे ही कार चोरीची असावी, असा पोलिसांनचा संशय आहे.