पुणे : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांनी चौकशीचा फास आवळला असून पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसनचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर केला होता. यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार आता रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बंडगार्डन पोलीस ठाण्यात  माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग  केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात  टेलिग्राफ एक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला आहे. 


राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा आरोप आहे. सध्या त्या केंद्रिय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद इथं कार्यरत आहेत.


याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डॉ. रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षीकाही फोन टॅपिंग केले होते. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर हा राजकीय मुद्दा बनला.