Stomach Flu In Mumbai: पावसाळा (Monsoon) सुरु होताच साथीच्या आजारांचा प्रसार होण्यास सुरुवात होते. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई महानगरमध्ये स्टमक फ्लू (गॅस्टॅोएन्टाराइटिस) चे (Gastroenteritis) रुग्ण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत जुलैच्या पहिल्या ८ दिवसांत जावळपास दररोज 60 रुग्ण स्टमक फ्लूचे (Stomach Flu) आढळले होते. 1 ते 8 जुलैदरम्यान गॅस्ट्रोचे 474 रुग्ण आणि जून महिन्यात 1744 रुग्ण आढळले होते. (Stomach Flu In Mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत झपाट्याने गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ होत आहे. त्यामुळं मुंबईकरांना आपल्या पोटाची काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा या फ्लूमुळं किडणी किंवा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्टमक फ्लू दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. दूषित पाणी आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने मुंबईकर पोटाच्या विविध आजारांनी बेजार झाले आहेत.  


हवामान विभागाच्या आकड्यांनुसार, जूनमध्ये दररोज गॅस्ट्रोचे 58 लोक स्टमक फ्लूमुळं ग्रासले आहेत. जुलैच्या पहिल्या आठ दिवसांतच 60 रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांत हमखास वाढ होते. दूषित पाणी आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने या आजार होतो. मात्र, या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हर, किडणीसारख्या अवयवांवर दु्ष्परिणाम होऊ शकते. यामध्ये जुलाब आणि उलट्या सतत होत असल्याने शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळं त्याचा शरीरावर परिणाम होते. अशावेळी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. 


दूषित पाण्याबरोबर शिळे आणि अस्वच्छ जागेत तयार केलेले अन्न किंवा उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रो होऊ शकते, त्यात डायरिया हे गॅस्ट्रोच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. यात डिहायड्रेशनमुळं शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. भूक मंदावते. दरम्यान, दूषित पाणी व अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील 12 ते 72 तासांत हा त्रास सुरु होते. 


काही रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आढळतात गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर काहींच्या पोटात किंवा आतड्यांना सूज येते त्याचबरोबर उलटी, जुलाब सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळं पावसाळ्यात खाण्या-पिण्याकडे विषेश लक्ष देणे गरजेचे आहे. 


काय आहेत लक्षणे


मळमळ, उलटी होणे


जुलाब होणे


पोटदुखी


सुरुवातीला दोन दिवस ताप येणे


काय करु नये


अशावेळी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असते


जेवण शिजवून खावे व त्यावर झाकण ठेवावे


बाहेरच जेवण टाळावे


शक्यतो जेवण गरम करुन खावे


हे टाळा


गॅस्ट्रोची लक्षणे दिसताच स्वतःच्या मनाने उपचार करु नका


बाहेरील फास्ट फूड आणि जंक फूड टाळावेत


बर्फ घातलेल्या ज्यूसचे सेवन करणे टाळा


शिळे अन्न खावू नका