BREAKING : नागपूरात CBI ची मोठी कारवाई; इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक
2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. तपासा अंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
CBI Raid in nagpur : नागपूरात CBI ने मोठी कारवाई केली आहे. या कारावई अंतर्गत सीबीआयने इन्कम टॅक्स अर्थात आयकर विभागाच्या(Income Tax) नऊ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तब्बल चार वर्षापासून CBI या प्रकरणाचा तपास करत होती. अखेरीस अटकेची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा घोटाळा(Exam Scam) प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेय(CBI Raid in nagpur).
अटक करण्यात आलेल्या उमेदवारांनी डमी उमेदवार परीक्षेत बसवून स्टाफ सिलेक्शनमधू नोकरी मिळवली. याप्रकरणी 9 आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. 2012 ते 2014 दरम्यान ही परीक्षा झाली होती. 2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. तपासा अंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
अटक झालेले सर्व कर्मचारी आयकर विभागात स्टेनोग्राफर आणि एमटीएस या पदावर 2014 पासून कार्यरत होते. या संदर्भात 2018 मध्येच सीबीआयने प्रकरण दाखल केला होता. त्याच प्रकरणाच्या तपास पूर्ण करत आयकर विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना सीबीआयच्या अँटी करप्शन अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
2014 मध्.े सिलेक्शनच्या परीक्षेत 9 जणांनी परीक्षेत स्वतः न बसता डमी उमेदवार बसवून स्टाफ सिलेक्शनची आणि आयकर विभागाची फसवणूक केली होती. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर 2018 मध्ये सीबीआईने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.
तपासा दरम्यान सीबीआईने या सर्व नऊ कर्मचाऱ्यांनी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत लिहिलेली उत्तरपत्रिका, त्यावरील त्यांचे हस्ताक्षर, स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे यांचा सखोल फॉरेन्सिक तपास केला. त्यात या परीक्षेत भरलेले आणि प्रत्यक्ष परीक्षा देतांना ठसे आणि हस्ताक्षर यात तफावत असल्याचा निष्कर्ष पर्यंत तपास पोहचला. त्यानंतर सीबीआय हे सर्व कर्मचारी डमी उमेदवार बसवून परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली. त्यानंतरच आयकर विभागातील या नऊ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.