अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : जिल्ह्यातील ज्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पुढील ३ महिन्यांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार नाहीत.  त्या शाळा, महाविद्यालयांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.  बारामतीत गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना बारामतीत घडली होती. या पार्श्वभूमिवर महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुणे ग्रामिण पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.


महत्त्वाचा निर्णय  


महिला सुरक्षणेचा प्रश्न ऐरणीवर आलायं. यासाठी देशभरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलायं. पुढील ३ महिन्यात शाळा, महाविद्यालयांत सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.