मुंबई : राज्य सरकारच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जमर्यादा वाढवण्याची मागणी राज्य सरकारने केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी केंद्राने ४५ हजार कोटीचं कर्ज उभारण्याची मंजुरी दिली होती. नव्या मंजुरीमुळे राज्याला ६५ हजार कोटींचं कर्ज उभारता येणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर एकूण ४.५ लाख कोटींचा बोजा पडणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.