सोलापूर विभागात मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी 31 मार्चपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाळवणी ते भिगवण या मार्गावर रेल्वे दुहेरीकरणाचं काम सुरू करण्यात येईल. यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या हुतात्मा, विशाखापट्टणमसह इतर 4 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर इतर 4 एक्स्प्रेसच्या मार्गात बदलही करण्यात आले आहेत.


भाळवणी ते भिगवण या मार्गावर मेवाको दुहेरीकरणाचं काम प्रगतीपथावर आलं आहे. या कामाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घ्यायचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर ही एक्स्प्रेस 12 मार्च, 15 मार्च, 19 मार्च, 22 मार्च, 26 मार्च, 29 मार्च, 31 मार्च रोजी धावणार नाही.


पनवेल-नांदेड ही विशेष एक्स्प्रेस 15 मार्च आणि 1 एप्रिल तर नांदेड-पनवेल ही एक्स्प्रेस 14 मार्च आणि 31 मार्च रोजी धावणार नाही.


याशिवाय विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस 12 आणि 30 मार्च रोजी चालवण्यात येणार नाही.