मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. पुणे विभागीतल पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या मार्गादरम्यान दुहेरीकरण, विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवारपर्यंत म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.


रद्द केलेल्या गाड्या 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    20  आणि 21 फेब्रुवारी रोजीची गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर- पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

  • गाडी क्रमांक 01023 पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

  • 22 फेब्रुवारीला सुटणारी गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (Kolhapur-Mumbai Koyna Express) 

  • गाडी क्रमांक 11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या रद्द केल्‍या आहेत. 

  • 23 फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक 01023 पुणे- कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द (Pune-Kolhapur Express Cancelled) करण्यात आली आहे.


काही रेल्वे गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन 


  • 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक 01542 कोल्हापूर- सातारा ही गाडी कऱ्हाडपर्यंतच धावेल

  • तर डेमू क्रमांक 01541 सातारा-कोल्हापूरचा प्रवास कऱ्हाड येथून कोल्‍हापूरकडे सुरू होईल. म्हणजेच ही गाडी सातारा- कऱ्हाडदरम्यान रद्द राहील. 

  • 21 आणि 22 फेब्रुवारीला सुटणारी गाडी क्रमांक 11425 पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल

  • गाडी क्रमांक 11426कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुण्‍यासाठी सोडण्यात येईल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान धावणार नाही

  • 21 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी क्रमांक 11040  गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल

  • तर 22 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथूनच सुटेल. 


बदल केलेल्या गाड्या 


21 फेब्रुवारी रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक 12630  हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड- कुर्डूवाडी- पंढरपूर- मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल.
21  फेब्रुवारी रोजी बंगळूरहून सुटणारी गाडी क्रमांक 16505 बंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस मिरज- पंढरपूर- कुर्डूवाडी- दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल. ही गाडी सांगली, कऱ्हाड, सातारा येथे येणार नाही.
17 व 18 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी गाडी क्रमांक 11030  कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून नियमित सुटण्याची वेळ बदलली असून ती दोन तासाने धावणार आहे. गाडीच्या वेळेत बदल केला असून 08.15 ऐवजी 10.15 वाजता अर्थात दोन तास उशिराने सुटेल.