Big Breaking: मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरुन अनिश्चित काळासाठी स्लो लोकल धावणार नाहीत
अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
Central Railway : अवकाळी पावासाचा मुंबई लोकल सेवेला मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरुन अनिश्चित काळासाठी स्लो लोकल धावणार नाहीत. तशा प्रकारची उद्घोषणा देखील रेल्वे स्थानकावर केली जात आहे. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. सीएसएमटीवरुन केवळ जलद लोकलची वाहतूक सुरु आहे. एकही धीमी लोकल सोडण्यात आलेली नाही. धीम्या मार्गावरुन प्रवास करणारे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका मागोमाग एक लोकस थांबल्या आहेत. यामुळे हजारो प्रवासी अडकले. कामावपुन घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. CSMT वरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. तब्बल 20 मिनटे लोकसल सायन आणि कुर्ल्याच्या मध्येच थांबली होती. भायकळा, दादर, कुर्ला, घाटकोपर तसेच सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
मुंबईत अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली होती. मात्र तब्बल 45 मिनिटानंतर वाहतूक सुरू झाली. धीम्या डाऊन मार्गावरील वाहतूक माटुंग्यापासून जलद मार्गावर वळवण्यात आली. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यानं घरी परतणा-या मुंबईकरांचा खोळंबा झाला. वाहतूक ठप्प झाल्यानं 45 मिनिटं डाऊन मार्गावरील लोकल एकाच ठिकाणी उभ्या होत्या. हजारो रेल्वे प्रवाशी लोकलमध्ये अडकून पडले. अखेर 45 मिनिटांनी हळुहळु मध्य रेल्वे पूर्वपदावर येत आहे. मात्र, लोकल उशीरा धावत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड
सोमवारी सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळूत झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. दुपारी 12 च्या सुमारास बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरु करण्यात आलीये.. मात्र ही लोकल फे-या अर्धा ते पाऊणतास उशिरानं धावत होत्या. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदारांचे मोठे हाल झाले होते. यानंतर दुपारी दिवसभरात दुसऱ्यांदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली. अंबरनाथ स्थानकाजवळ झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर पडल्यानं मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली.