Centre Letter to Maharashtra: करोना रुग्णसंख्येत वाढ, मोदी सरकारने महाराष्ट्राला लिहिलं पत्र
Centre Letter to States: करोना (Covid) रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्राने (Central Government) सहा राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही (Maharashtra) समावेश आहे. पत्रामध्ये केंद्र सरकारने राज्यांना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यास तसंच प्रसार रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली आहे.
Centre Letter to States: करोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने केंद्राने (Central Government) राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांचाही समावेश आहे. केंद्राने पत्रात करोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी (Union Health Secretary) महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), तेलंगण (Telangana), तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala) आणि कर्नाटकला (Karnataka) पत्र लिहिलं असून चाचण्या, उपचार, रुग्ण शोधण्यावर आणि लसीकरणावर भर देण्यास सांगितलं आहे.
"काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून स्थानिक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं दिसत आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला जोखीमशी आधारित मूल्यमापन करावं लागणार आहे. यामध्ये आपण आतापर्यंत करोनाशी लढताना जे य़श मिळवलं आहे ते गमावून चालणार नाही," असं पत्रात सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल चार महिन्यांनी देशात एकाच दिवशी 700 रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 4623 वर पोहोचली आहे. देशात 12 नोव्हेंबरला 734 रुग्ण आढळले होते.
पत्रामध्ये राज्यांनी करोना स्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच गरज पडल्यास तिथे योग्य ते निर्बंध लागू करावेत असं सांगण्यात आलं आहे.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून काही राज्यांमध्ये करोना चाचणीच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत असल्याचा इशारा दिला होता. ही चिंतेची बाब आहे असं सांगताना त्यांमी याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे असं म्हटलं होतं.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत आता एकूण संक्रमणांपैकी 0.01 टक्के आहेत, तर रिकव्हरी रेट 98.80 वर पोहोचली आहे. दरम्यान कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,57,297 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. देशात आतापर्यंत लसीचे 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत.