नाशिक : भाजप नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देता त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याचा प्रकार मनाला चटका लावणारा असल्याची प्रतिक्रिया यावेळी छदन भुजबळांनी दिली. आदित्य ठाकरेंच्या निमित्तानं तरुण नेतृत्व समोर येत असल्यानं त्यांनाही छगन भुजबळ यांनी शुभेच्छाही दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुजन समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यात नेहमी चर्चा होत असे. बहुजन समाजाचे प्रश्न आणि आरक्षण याविषयी छगन भुजबऴ आणि एकनाथ खडसे यांच्यात चर्चा होत असे.


येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोठं शक्तिप्रदर्शन केलं. यंदा छगन भुजबळ चौथ्यांदा येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.