Chaitra Navratri 2021 :  चैत्र नवरात्री हा हिंदू बांधवांचा महत्वाचा उत्सव आहे.  नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवात देवी भगवती- दुर्गेची आराधना केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नऊ दिवस देवीची पूजा, भजन, नामस्मरण, उपवास केले जाते. या दिवसांमध्ये देवीची पूजा केल्याने तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. 


चैत्र नवरात्रीला वसंत नवरात्री असं देखील म्हटलं जातं. देवीच्या महत्वाच्या सर्व शक्तीपीठांवर आज घटाची स्थापना केली जाते.


महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवानंतर देवीच्या आराधनेसाठी चैत्र नवरात्रोत्सवाला मोठे महत्व आहे. राज्यातील साडेतीन शक्तीपीठे म्हणजेच तुळजापूरची भवानी, माहूरची रेणूका, कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तश्रृंगी होय. या ठिकाणीसुद्धा चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना केली जाते.


चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपूत्रीच्या आराधनेला समर्पित केला जातो. देवी शैलपूत्रीला हेमावती असेही म्हणतात. 


पुराणानुसार देवी हेमावती हिमालयाची मुलगी मानली गेली आहे. त्यामुळे तिचे नाव हेमावती होय. 


नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपूत्रीला प्रसन्न करण्यासाठी 
ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥ या मंत्राचा जाप करावा
Om Devi Shailaputryai Namah॥