कोल्हापूर : farmers issue : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन केले. (Chakkajam of Swabhimani Shetkari Sanghatana) आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती. (Swabhimani Shetkari Sanghatana protest) शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघनेनी केली आहे. त्यासाठी हे आंदोलन करत आहेत. (Chakkajam of Swabhimani Shetkari Sanghatana blocked Kolhapur-Ratnagiri road on farmers' issue)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग रोखून धरलाय. शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानीनं गेल्या 20 दिवसापासून आंदोलन केले आहे. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात आंदोलन सुरू असल्याची खिल्ली काही जणांनी उडविली होती. त्यानंतर स्वाभिमानी आक्रमक होत आज राज्यभर चक्का जाम आंदोलन पुकारलं.



12 वीची आज परीक्षा असल्याने स्वाभिमानी संघटनेने 11 नंतर चक्का जाम आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलन बारावीचं मुलं परीक्षेला गेल्यानंतर करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना मदत करा, असेही त्यांनी म्हटले आहे.