मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिलं आहे. सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील रोखठोकसाठी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यापुढे काही पर्यायही ठेवले आहेत. याबाबतचं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 


काय म्हणाले चंद्रकांत पाटील?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत, सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील 'रोखठोक' साठी माझे प्रस्ताव....


नंबर १ - "मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली...... ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे.......तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द.......


मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं....हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे...."


नंबर २ - "पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला......सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते..........


पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत.................. मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही................. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे....."


नंबर ३. "ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे.............. यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही............... मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे......


दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत............. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे..."


नंबर ४. "राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले............. अजूनही अंमलबजावणी नाही............... शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत........


खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही.................. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे....."





राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या निवडीवरून संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपवर रोखठोक या सदरातून निशाणा साधला होता. विधानपरिषदेत १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरपर्यंत हे सरकार पाडू आणि त्यानंतर येणारं सरकार या १२ सदस्यांची नियुक्ती करेल, यावर बाहेर पैजा लागल्या आहेत, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे, असं राऊत म्हणाले होते. 


या राजकारणात राज्यपाला नावाची संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असे राऊत यांनी लिहिलं होतं. 


'ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत'