पुणे : Chandrakant Patil on Mahavikas Aghadi Government : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे. पाच वर्षात तुमचं कर्तुत्व काय आहे. तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का, अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Chandrakant Patil criticized  Mahavikas Aghadi government)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पेक्षा पुण्यात जास्त संसर्ग होत आहे. कोरोना आता घातक नसला तरी काळजी मात्र घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरे व्हावे, हीच आमची इच्छा होती. चार्ज तरी दुसऱ्यांना द्यायला हवा, इतकीच आमची इच्छा होती, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.


जर केंद्राने जर सगळं द्यायच आहे, तर राज्यच केंद्राला चालवायला द्या. सगळं केंद्राने दिलं तरी दोष तुम्ही केंद्राला देता. केवळ तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का? पाच वर्षात तुमचं कर्तृत्व काय आहे. जीएसटीचे पैसे जीएसटी काऊन्सिल देणार होते, केंद्र सरकार नाही. तरी केंद्र मदत करत आहे. खोटं बोल पण रेटून बोल, इतकचं हे सरकार करत आहे, अशीटीका चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.


आपल्याला कोरोनाच कारण सोडून इतर कुठल्याच कारणाने निवडणूक पुढे ढकलता येणार नाही. ओबीसी आरक्षणासाठी फक्त दिखावा केला जात आहे. पाऊल काहीच उचलल जात नाही, हे सत्य आहे. आम्ही सरकार आल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी काम सुरु करतो. येणारी निवडणूक हे कसे लढणार एकत्र की वेगळे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.