कोल्हापूर : संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या मुलाखतीवर टीका केली असून महाविकासआघाडीला आव्हान देखील दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामनामध्ये शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत होणार म्हणून सामनाचा सेल वाढवला. या मुलाखती मधून सरकार स्थिर आहे, हे सरकार बदलत नाही हा संदेश द्यायचा होता. या मुलाखातीमधून प्रशासनामध्ये चलबिचल पण सुरू होती. ती थांबवायची होती. तुम्ही वेगवेगळे लढून पाहायला होत. महाराष्ट्रात एकदा टेस्ट होऊन जावू द्या. असं आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.


सर्वांनी वेगवेगळे लढून पाहू. प्रामाणिक लढायचं. पण दोन दिवस आधी सेटलमेंट करायचं नाही. शरद पवार यांनी सत्तेचा दर्प म्हटलं. पण लोकांनी मतपेटीतून तस काही म्हटलं नाही. आम्ही काही म्हटलं, तर आमचे राऊत काहीही लिहितात अशी टीका देखील त्यांनी केली.


त्यामुळे आम्ही या सरकारवर काहीही बोलायचं नाही अस ठरविलं आहे. पण विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडत राहणार. देवेंद्र फडणवीस शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत आपलं मत लवकरच मांडतील. भाजप राष्ट्रवादीकडे गेले होते की राष्ट्रवादी भाजपकडे आले होते यावर फडणवीस बोलतील, ते खूप सिक्रेट आहे. असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.