`...तर दहा लाख रुपयांचं बक्षीस देऊ`
येत्या आठ दिवसात जो कुणी डॉल्बी जामर यंत्रणा बनवून देईल आणि तो सिद्ध करेल त्याला आपण दहा लाख रुपये बक्षीस देऊ
कोल्हापूर : येत्या आठ दिवसात जो कुणी डॉल्बी जामर यंत्रणा बनवून देईल आणि तो सिद्ध करेल त्याला आपण दहा लाख रुपये बक्षीस देऊ, असं खुलं आव्हान राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय.
डॉल्बी लावण्यावरुन सार्वजनीक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी ही शक्कल लढवलीये. कोल्हापूरातील मानाच्या शिवाजी चौक इथल्या महागणपतीच्या उद्धाटन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.