`राज्य महामार्गावरील बहुतेक खड्डे बुजवले`
`राज्य महामार्गावरील बहुतेक खड्डे बुजवले`
नागपूर : राज्यात 15 डिसेंबर ही खड्डे बुजवण्याची डेडलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलीय. या डेडलाईनला काही दिवस राहिले असताना राज्य महामार्गावरील बहुतेक सर्व खड्डे बुजवल्याचा दावा या खात्याचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलाय.
राज्यात 22 हजार किमीचे राज्य महामार्ग आहेत. तर मुख्य जिल्हा रस्ते म्हणजेच मेजर डिस्ट्रिक्ट रोडवरील 77 हजार किमी मार्गावरील उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण केले जाणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय. थोडक्यात अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच खड्डे मुक्तीचा दावा सरकार करायला लागलंय.