चंद्रपूर : राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून, नवे कर्ज मिळविण्यासाठी राज्य सरकारची दमछाक होत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर येथील एका आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. पवार म्हणाले राज्याचे आर्थिक धोरण स्पष्ट नाही. विदेशातून राज्यात पैसे आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरकार सांगते आहे. मात्र, सरकारचा हा प्रकार दिशाभूल करणारा आहे. कारण, कोणत्याही राज्याला अशा प्रकारे विदेशातून थेट पैसे आणता येत नाहीत. त्यासाठी केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते. ही मान्यता घेतल्यावर येणारा पैसा केंद्राकडे येतो. त्यानंतर मग हा पैसा राज्याला मिळतो, अशी माहितीही अजित पवार यांनी या वेळी दिली.



दरम्यान, सिंचनाच्या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. अजित पवार म्हणाले सरकारने सिंचन प्रकल्पाची श्वेतपत्रीका काढली. यात आमच्या सरकारच्या काळात सिंचन सहा टक्क्यांनी वाढल्याचे सत्य पुढे आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा म्हणावा तसा प्रचार झाला नसल्याची खंतही पवार यांनी या वेळी बोलून दाखवली.