Chandrapur Crime News : पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. यावेळी पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींवर देखील त्याने हल्ला केला. वादातून या व्यक्तीने जीवघेणे कृत्य केल्यामुळे चौकोनी कुटूंब क्षणात उद्धवस्त झाले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तपासात हत्ये मागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथे ही घटना घडली आहे. मृत पत्नीचे नाव आशा मनोज लेनगुरे (वय 38 वर्षे) असे आहे.  तर अंजली मनोज लेनगुरे (वय 17 वर्षे) आणि पुनम मनोज लेनगुरे (वय 12 वर्षे) अशी जखमी मुलींची नावे आहेत. दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पती मनोज लेनगुरे (वय 40 वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. उमरी पोतदार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 


काय घडलं नेमकं?


आरोपी पती मनोज आपल्या आपल्या दोन मुलींसह नुकताच एका घरकुलात राहण्यासाठी गेला होता. अल्पभूधारक शेतकरी असलेला मनोज आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे त्यातूनच मंगळवारी पहाटे या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान घरातील कुऱ्हाड हाती घेऊन मनोजने पत्नीवर डोक्यावर वार करत तिला ठार मारले. तर, मध्ये आलेल्या मुलींना देखील कुऱ्हाडीचे वार करत जखमी केले. दोन्ही मुली अत्यवस्थ स्थितीत आहेत. 


जबर मारहाण करून दरोडा टाकणा-या आरोपींना अटक 


गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहनचालकांना लुटणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार गिरवर पिछोरे रा. लट्टीटोला (बाम्हणी) हे त्याचे नातेवाईकासह काटी येथील बैलबाजारातून 17 बैल खरेदी करुन एका ट्रक मध्ये भरुन रायपुर (छ.ग.) येथे जात होते. यावेळी आरोपींनी दोन चारचाकी वाहनाने जावुन दरेकसा घाट येथे ट्रक अडवला.  
ट्रकमधील लोकांना लोखंडी पाईपने जबर मारहाण करुन त्यांच्याकडी 81 हजार रुपयांची रोजड जबरदस्तीने हिसकावली. धाडसी दरोडा टाकुन आोरपी पळून गेले. पोलिसांनी काही तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या.