चंद्रपूर : यंदा कमी पाऊस झाल्याने चंद्रपूर महापालिकेने महाऔष्णिक वीज केंद्राचे काही काही संच बंद करण्याची राज्य सरकारकडे मागणी केलीय.


विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यात अवघा ७४५ मिमि पाऊस झालाय. सरासरीच्या ५३ टक्केच हा पाऊस झालाय. त्यामुळे साडेतीन लाख संख्या असलेल्या चंद्रपूरला पुढच्या पावसापर्यंत पाणीपुरवठा कसा करायचा असा प्रश्न उभा ठाकलाय. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे काही संच बंद करण्याची विनंती पालिकेने सरकारकडे केलीय.