चंद्रपूर : निवडणुकीत कोण काय आश्वासनं देईल याचा नेम नाही. दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट बहुतेकांच्या भावनेलाच हात घातला. गाव तिथे बिअर बार ही घोषणा त्यांनी दिली आहे. निवडून आलो तर ही घोषणा प्रत्यक्षात आणू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याशिवाय बेरोजगार तरूणांना दारूविक्रीचे परवाने द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. वनिता राऊत या चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांनी ही पत्रकं वाटली आहेत. त्यांच्या या अनोख्या घोषणांची आता मोठी चर्चा होऊ लागली असून, त्यांचं पत्रकही चांगलंच व्हायरल झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिमूर मतदारसंघात काँग्रेसचे सतीश वारजूकर आणि भाजपचे किर्तीकुमार भांगडीया यांच्यात लढत रंगणार आहे. पण वनिता राऊत या सध्या आपल्या या वेगळ्या आश्वासनामुळे चर्चेत आले आहेत. पण आता २४ ऑक्टोबरला या आश्वासनाला लोकं किती प्रतिसाद देतील ते समोर येईल.


अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट दारु विक्रीचं समर्थन केलं आहे. चंद्रपुरात दारुबंदी आहे. त्यामुळे गाव तिथे बिअर बार या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. इतकच नाही तर बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु अशा घोषणा देखील त्यांनी केल्या आहेत.