आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : लहान भावाने मोठ्या भावाचा व वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना (Younger brother killed elder brother and sister in law) चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे घडली आहे. या हत्येचे कारणही समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या भावासोबत जमिनीसाठी झालेल्या वादातून लहान भावाने टोकाचं पाऊल उचललं. लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


सावली तालुक्यातील  मनोहर गुरुनुले (6)2 आणि शारदा मनोहर गुरुनुले (50) यांचा लहान भाऊ धनराज गुरुनुले (52 ) यांच्या सोबत जमिनीवरुन सातत्याने वाद व्हायचा.


त्यानंतर सोमवारी हा वाद टोकाला गेला आणि दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणात धनराज गुरुनुले याने मोठा भाऊ मनोहर व वहिनी शारदा यांच्यावर जमीन खोदण्याच्या सब्बलने हल्ला केला.


 त्यात मनोहर गुरुनुले हे जागीच ठार झाले तर शारदा गुरुनुले यांना जखमी अवस्थेत सुरुवातीला सावली व नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व त्यांनी आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पाथरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.