नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलेले चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं आज नागपुरात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दुपारी चार वाजता अंबाझरी घाट इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातल्या रायपूरमध्ये झाला होता. त्यांच्यावर गांधी विचारांचा मोठा पगडा होता. जन्मापासून ते केवळ खादी कपड्यांचाच वापर करत असत. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत त्यांची मोठी साहित्यसंपदा होती.  १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. 


'झी २४ तास'च्या अंतरंग या खास कार्यक्रमात चंद्रशेखर धर्माधिकारी यांची मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपला जीवनपट उलगडून दाखवला. त्यांच्यावर गांधीवादाचा कसा पगडा होता, हेही त्यांनी उलगडून दाखवलं होतं.  


व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा