परभणी : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) हे ओबीसी (Obc) होते असं वक्तव्य माजी मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलंय. शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांना (Maratha Reservation)  आरक्षण होतं. मात्र मोठे पण मिरवण्याच्या नादात तथाकथित मोठ्यांनी आरक्षण नाकारलं आणि आजची अवस्था निर्माण झाल्याचं जानकरांनी सांगितलं. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते. (Chatrapati shivaji maharaj is obc says former minister and rashtriya samaj paksha chief mahadev jankar at gangakhed parbhani during to obc agiation) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगाखेड येथे 31 नोव्हेंबरपासून ओबीसी एल्गार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला जानकर यांनी भेट दिली. त्यावेळी जानकर यांनी आंदोलकांना संबोधित केलं.


जानकर काय म्हणाले? 


"आमचं होऊ द्या 30 ते 35 आमदार 10 मिनिटांत ओबीसीची गंमत करून दाखवतो. मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो. मुस्लिमांवर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितले की मुस्लिम. अंड्याचे दुकान बघितले की मुस्लिम. कोंबडीचं दुकान बघितलं की मुस्लिम कुठं कलेक्टर नायं,बोंबाबोंब. राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. म्हणून आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे", असं जानकर म्हणाले. 


"मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं. पण नंतर मराठ्यांचं आरक्षण का गेलं ? छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. ते कुळवाडी भूषण होते. पण आमच्या तथाकथीत लोकांना वाटलं आम्ही लई मोठं आहे गावचं. आम्हाला नकोय तसलं आरक्षण. आणि आज आवस्था काय झाली आहे", असं जानकरांनी नमूद केलं.