Chhagan Bhujbal on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांनी (Sharad Pawar) नुकतीच बीडमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी बीडच्या (Beed) नेतृत्वावर हल्लाबोल करत अजित पवार गटाला टार्गेट केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बीडमध्ये उत्तरसभा घेतली. त्यावेळी अजित पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी तुफान बॅटिंग केली. सभेमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal on Sharad Pawar) थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आणि जोरदार हल्लाबोल केला आहे.


नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली. हा छगन भुजबळ अडीच वर्ष आतमध्ये होता. तुम्ही म्हणता घाबरला म्हणून गेला. हा छगन भुजबळ तुमच्यासोबत 1991 पासून आहे. तुम्हाला जेव्हा काँग्रेसमधून बाहेर काढलं, तेव्हा हा छगन भुजबळ तुमच्यासोबत होता. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. राजकारणात पुढे जायचं असतं, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.


साहेब आमचं काय चुकलं सांगा. तुम्ही आमच्यावर हल्ले का करता आहात? हल्ले कुठल्या प्रकारचे करता? इथे येयचं आणि अमरसिंह पंडीत यांच्यावर काहीतरी बोलायचं... दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय. तुम्ही धनंजय मुंडेंचा इतिहास काढलात. तुम्हीच सांगितलं होतं. खासगी गोष्टींवर बोलायचं नाही. आता तुम्ही कुठून कुठं आलात. बोलायला गेलं तर खूप आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.


पाहा Video



दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवारच आहेत. जनतेचा महासागर सांगतोय राष्ट्रवादी अजित दादांसोबतच आहोत, असं छगन भुजबळ बीडमधील जाहीर सभेत म्हणाले आहेत. अजितदादा तुमचे नेते आहेत तर त्यांना पाठिंबा देऊन टाका. पवारसाहेब तुम्ही काय बोलता? हे आम्हाला समजतच नाही. गुगलीमध्ये स्वत:चा गडी बाद करतात का? असा खडा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. त्यावेळी तेलगी स्कॅमवरून देखील छगन भुजबळ यांनी प्रश्नांच्या फेऱ्यात अडकवलं आहे.